थोडावेळ तशीच पडून मी अंकिता ला म्हणाले आज जरा लवकरच पार्लर बंद करू..मला देखील थकायला झालंय , उद्या सकाळी ये लवकर , अस म्हणून आम्ही पार्लर बंद केलं आणि मी घरी आले ..मस्तपैकी अंगावर पाणी घेतल आणि फ्रेश झाले, थोडा क्षीण गेला आणि मिस्टरांच्या पाशी आले..”अहो काय म्हणताय वेळ जातोय की नाही..? आणि राधाला सगळं सांगून ठेवलंय हा सगळ वेळेवर द्यायला.., ” मिस्टर माझा हात हातात घेऊन म्हणाले अग किती धावपळ करतेस तू आणि मी घेईन माझ्या हाताने ,मी काही अपंग झालो नाही थोडा आराम करायला सांगितलं एवढंच…एक महिन्यात पळायला लागेन बघ…, नाही हा अगदी चांगला आराम करायचा ” मी थोडी रागातच म्हणाले, ” पूर्ण पथ्य पाळून चांगलं बरं व्हायचं आणि व्यायाम म्हणजे फक्त चालायला सांगितलं आहे डॉक्टरनी ,” अहो तुम्ही काय कमी कष्ट केले आहेत का आतापर्यंत ..आता तुम्ही आजारी असाल तर आमची पण जबाबदारी आहेच ना..”अग आपण पार्लर उघडलं नसत तर आज कशाचा आधार असता याचा विचार करून मी चक्रावतो..तू माझ्या साथीला नसतीस तर काय झालं असत ग..? ” अहो काय हे .? नवरा बायको च नातच अस असत ना दोघांनी एकमेकांना जन्मभर साथ द्यायची असते ना..चला आता जास्त विचार नको करू ती फळ खाऊन घ्या आधी थोडी..सफरचंद कापता कापता मी म्हणाले..”अहो आमच्या पार्लर मध्ये मुलगी आहे ना तिच्या ओळखीत एकाने आम्हाला ऍडव्हान्स पैसे दिले आहेत त्यांचं म्हणणं आहे की शहरातील समारंभाच्या ऑर्डर आपण त्यांना पूर्ण करून द्यायच्या..चक्क एक लाख दिलेत त्यांनी.आणि ऑपरेशन ला लागणार म्हणून मी नाही म्हणू शकले नाही..मिस्टरांचा हात हातात घेऊन मी म्हणाले, ” अहो माझं चुकलं नाही ना काही.” अग नाही ग..तू प्रसंगानुरूप वागलीस .आणि काही फुकट घेतलं नाही आहेस ..धंदा असाच तर असतो .त्यांनी ऍडव्हान्स दिलेत ते ऑर्डर पूर्ण करून तू देशील..आणि सुमेधा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे..तू जे करशील ते आपल्या कुटुंबासाठीच करशील..आणि यांनी माझ्या हाताचे चुंबन घेतले ..मी शहारले आणि बाजूला झाले..” अहो काय करताय राधा आहे घरात” मिस्टर हसले आणि म्हणाले मग बाहेर जाऊया का..?
आता जास्त लाडात नका येऊ या गोष्टीला आता काही दिवस बंदी आहे तुम्हाला माहित आहे ना..तसे मिस्टर म्हणाले अग हीच तर मोठी शोकांतिका आहे ना समोर अशी लावण्यखणी आणि कमनीय बायको असून काही करता येत नाही ना…इश्श …काहीतरीच ..मी लाजेने आत गेले. आणि जेवणाची तयारी करू लागले..खर म्हणजे मला देखील यांचा सहवास हवासा वाटत होता परंतु त्यांच्या तब्येतीला ते योग्य नव्हतं..आणखी काही दिवस तरी ते योग्य नव्हतं..आता यांचे पथ्य पाणी, व्यायाम हे रुटीन झालं होतं अधून मधून हे बाहेर मोकळ्या हवेत चालायला जायचे..मी जास्त हेल्दी खायला घालायचे यांना..तशी तब्येत सुधारली होती यांची..आता जास्त बाहेरच्या ऑर्डर घेत नव्हते ..एके दिवशी मी अंकिता ला म्हणाले की अग एखादी बाहेरची ऑर्डर तू करशील का..तसं ती म्हणाली करेन ना, तसही आता तुमचं पाहून शिकली आहे मी मेकअप करायला..ठीक आहे मग तसंच काही अर्जेंट असेल तर सांगेन मी..आणि मी कामाला लागले..जेमतेम दोन गिऱ्हाईक झाली होती संध्याकाळ पर्यन्त आणि जायची वेळ झाली..
एवढ्यात अंकिता चा मोबाईल वाजला. अंकिता बोलायला कचरत होती ..तर मी म्हणाले अग बोल ना काही कामाचं असेल..तशी तिने फोन उचलला आणि बोलू लागली..थोडक्यात संभाषण तिने आटोपलं आणि म्हणाली..” अहो मॅडम आपल्याला नाही का ज्यांनी एक लाख ऍडव्हान्स दिले त्यांचा फोन होता ..म्हणत होते मोठी ऑर्डर आहे ..पार्टी मोठी आहे ..पैसे देखील चांगले मिळणार आहेत..पण तिकडे तीन दिवस राहावे लागेल..मी म्हणाले,” दोन दिवस ..? अग कसं शक्य होणार..? आमचे मिस्टरांच पथ्य पाणी वगैरे सगळं कोण बघणार ..? नाही शक्य होणार..अहो पण ही ऑर्डर जर आपण पूर्ण केली तर खूप मोठ्या आणि चांगल्या ऑर्डर आपल्याला मिळू शकतात..आणि हवं तर आपण आणखी मदतीला घेऊन जाऊ ना हवं तर..मी म्हणाले, ” बघू तू आता काही त्यांना सांगू नकोस मला यांच्याशी बोलावं लागेल आधी..अस बोलून आम्ही पार्लर बंद केले आणि मी घरी आले..फ्रेश होऊन यांच्या सोबत चहा प्यायला बसले ..
मिस्टरांसाठी मात्र काढा केला होता..चहा पिता पिता मी विषय काढला ,” अहो मी तुम्हाला म्हणाले होते ना आपल्याला बाहेरच्या ऑर्डर देणार आहेत म्हणून ज्यांनी आपल्याला ऍडव्हान्स दिलं त्यांनीच आणली आहे ऑर्डर ..पार्टी खूप मोठी आहे म्हणे आणि या ऑर्डर वर आणखी मोठ्या ऑर्डर अवलंबून आहे ..पण मी त्यांना नकार द्यायचं ठरवलं आहे कारण मला आणि अंकिताला तीन दिवस तिथे राहायला लागणार आहे..”अग धंदा म्हटला की या गोष्टी आल्याच..तू नाही का म्हणतेस..? अहो पण तुमच्याकडे कोण पाहणार..? नाही नको मी एका दिवसाची ऑर्डर असेल तरच करेन..अग माझी काय चिंता करतेस मी ठणठणीत आहे अगदी आणि तसंच वाटत तुला तर आपण माझ्या बहिणीला बोलावून घेऊ मग तर झालं…ती करेल काय असेल तर तीन दिवसांचा तर प्रश्न आहे..
अशारितीने हो ना करत मी तयार झाले आणि दुसऱ्या दिवशी अंकिताला म्हणाले ठीक आहे त्या पार्टीला सांग आम्ही तयार आहोत कधी निघायच आहे तेवढं सांग म्हणावं..आणि आम्ही दोघी असणार आहोत म्हणून सांग..अंकिता देखील खुश झाली तिने लगेच सगळं फोनवर मित्राला सांगितलं आणि आमचं दोन दिवसांनी ऑर्डरला जायचं ठरलं..मी सगळं राधाला आणि यांच्या बहिणीला समजावून सांगितलं काही समजलं नाही तर फोन करायचा म्हणून बजावलं…माझी पॅकिंग करून ठेवली आणि यांना म्हणाले अहो नक्की जाऊ ना मी..? तुम्ही काळजी घ्याल ना स्वतःची..तसे मिस्टर म्हणाले अग लहान बाळ आहे का मी …तू निश्चिंत जा आणि या दोघी आहेतच ना इथे..आणि हो तू कसली काळजी करू नको पूर्ण तुझ्या ऑर्डर कडे लक्ष दे .मोठी पार्टी आहे ..मोठे लोक असतील त्यांना चांगली सर्व्हिस मिळाली तर ते खुश असतात..नाहीत बिघडतात त्यामुळे पूर्ण लक्ष तुझ्या कामाकडे ठेव..मी हो म्हणाले पण शेवटी घराची चिंता तर असणारच होती ..दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि अंकिता मुंबईला जायला निघालो ..तिकीट वगैरे सगळं त्यांनीच अरेंज केलं होतं संध्याकाळी मुंबईला पोचलो अन कार्यक्रम ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणीच राहायची व्यवस्था सर्व पाहुण्यांसाठी केली असल्याने आम्हाला देखील एक रूम दिली होती..आम्ही सर्व सामान रूम मध्ये ठेवलं आणि फ्रेश झालो..अन मी मस्त मऊशार गादीवर पडले आणि घरी फोन लावून सर्व खुशाली घेतली आणि राधाला पुन्हा यांच्याकडे लक्ष द्यायला बजावलं..एवढ्यात आम्हाला ज्या मित्राने ऑर्डर दिली होती त्याचा अंकिताला फोन आला..प्रवास कसा झाला इथपासून सगळी माहिती त्याने घेतली आणि काही अडचण भासल्यास सांगायला सांगितलं..आमचं काम खऱ्या अर्थाने दुसऱ्या दिवशी सकाळपासून चालू होणार होत ..नवऱ्याच्या नात्यातील बहिणी, मामी, आत्या , काकी, पाहुणे म्हणून आलेल्या मैत्रिणी या सर्वांचे मेकअप करायचे होते तसे त्या मित्राने आणखी दोन मुली मदतीला पाठवतो अस देखील म्हणाला..एवढ्यात दरवाजाची बेल वाजली…
अंकिताला म्हटलं अग उघड दरवाजा ..तर बाहेर वेटर उभा होता मॅडम आपले जेवण लावले आहे चला रेस्टॉरंट मध्ये..” आम्ही म्हटलं आलोच आम्ही ..तसही कधी जेवून झोपायला मिळत अस झालं होतं..आम्ही मागोमाग आवरून खाली आलो आणि जेवणाचा बुफे लावला होता त्या ठिकाणी जाऊन जेवण घेतलं..आम्ही ज्या टेबलवर जेवण घेऊन बसलो त्याच टेबलवर काही तरुण येऊन बसले..कदाचित नवरदेवाचे मित्र असावेत…मी जरा सावरून बसले..त्यांची आपापसात चेष्टा मस्करी चालूच होती..अंकिता आणि विशेष करून मला सारखे अधून मधून न्याहाळत होते..मला तर कसेसेच झालं होतं..अगदी अवघडल्यासारखं..त्यातील एकाने शेवटी मोका साधून मला विचारलंच , आपण कोण नवऱ्याच्या..? तशी मी कचरत म्हणाली ,..आम्ही मेकअप च्या ऑर्डर ला आलो आहोत..तसं एक सुरात ते म्हणाले ..”अरे वा मग सकाळी आम्हाला पण थोडं फेसपॅक लावून द्या की…” मी जरा चिडलेच ..” मिस्टर आम्ही लेडीज ना सर्व्हिस देतो फक्त..
तसं तो म्हणाला ..” अहो त्यात काय मुंबईत तर हे कॉमन आहे..आणि फक्त मेकअप तर करायचा आहे आणि तसही अशावेळी जास्त रेट लावायचा..त्याने कमाई पण जास्त होते..कसं..? असे म्हणून ते हसायला लागले..मी वैतागून म्हणाले ..” प्लिज तुम्ही आता शांत राहता का नाहीतर आम्हीच जातो दुसऱ्या टेबल वर..त्यावर त्यातील एक रुबाबदार तरुण म्हणाला ..” अरे जाऊदे रे आपला चेहरा मॅडम ना आवडला नसेल..” तसही मॅडम आम्ही एवढे पण वाईट नाही हा..हा बघा हा रोहित I T कंपनी मध्ये जॉब करतो ..पगार फक्त 3 लाख महिना..हा केदार multinational कंपनीत मॅनेजर..पगार फक्त 5 लाख महिना..हा अमर याचा बिजीनेस आहे स्वतःचा..पाच करोड चा महिना टर्न ओव्हर…आणि माय सेल्फ अमित..पाटील अँड पाटील इन्फ्रास्ट्रक्चर नाव ऐकलं का..मी दचकले आणि म्हणाले.” हो ..तसं तो म्हणाला ते आमचंच आहे..” मी तर गारच झाले होते..अहो एवढ्या मोठ्या लोकांकडे तर स्वतःचे मेकअपमन देखील असतील ना..त्यावर ते सर्व मोठ्याने हसले..अहो मॅडम मेकअप मन आम्ही ठेवायला काय ऍक्टर नाही आहोत आणि तसही असले तरी तुमच्यासारखे सुंदर आणि घरगुती मटेरियल नाही ना…मी तर आता चक्रावलेच ..अहो घरगुती काय म्हणताय नक्की…?? तसे तर भानावर आले आणि म्हणाले “म्हणजे सनी लियोनी आणि अमृता राव मध्ये फरक असतो मॅडम ..आम्ही नेहमी मुंबईत चुलीवरच जेवण शोधत फिरत असतो…पिठलं भाकर, गावठी रस्सा याला जास्त पैसे देतो आम्ही..आपल्याला तर सात्विक सौन्दर्य खूप आवडतं बाबा..” मी आता भरभर जेवण संपवले आणि उठले..” तुम्ही समजत असाल त्यातल्या आम्ही नाही चला बाय..” अहो मॅडम राग धरू नका आमचा उद्देश वाईट नव्हता..आणि चांगल्या सौन्दर्याची तारीफ करू नये का..? अहो इथे खुप आल्या आहेत मैत्रिणी आणि पाहुणे मंडळी त्यातील बघा ..मी रागात वरती निघून आले पण एवढ्या संभाषणात अंकिता मात्र गालातल्या गालात हसत असल्याचे मला जाणवले..
आम्ही आमच्या रूम मध्ये आलो आणि मी दार लावून घेतले आणि अंकिताला म्हटलं अग ते एवढे सरळ सरळ फ्लर्ट करत होते आणि तू काहीच बोलली नाहीस..तशी ती म्हणाली अहो ती माणस किती मोठ्या घरातील आणि राग येऊन आपल कॉन्ट्रॅक्ट गेलं असत मग..? हे बघ अंकिता मोठ्या कॉन्ट्रॅक्ट साठी मी फालतूगिरी सहन करणार नाही ..तू सांगून टाक तुझ्या मित्राला इथे आम्हाला त्रास झाला तर आम्ही निघून जाऊ..मॅडम तुम्ही शांत व्हा मी सकाळी सांगते त्याला व्यवस्थित आणि आता झोपा शांत ..उद्या सकाळी लवकर उठून बरच काम करायचं आहे तीन दिवस सलग प्रोग्रॅम आहेत आणि तिन्ही दिवशी मेकअप करायचे आहेत..चला झोपा बघू ..अस म्हणून अंकिता ने लाईट सुद्धा बंद केली ..” मी विचारात पडले होते की मुंबईत आल्यावर अंकिता एकदम फ्री वागत होती.आणि सराईत असल्यासारखी वागत होती..प्रवासाच्या त्रासाने तशी विचार करता करता लगेच झोप लागली ..
सकाळी लवकर सहा वाजता उठून आम्ही सात पर्यंत तयार झालो आणि आमच्या कामाला लागलो..दोन मुली देखील आता आमच्या मदतीला आल्या होत्या..कार्यक्रम साधारण अकरा वाजता सुरू होणार होता आणि आम्हाला किमान पंचवीस जणांचा तरी मेकअप पूर्ण करायचा होता आणि त्यात काही स्त्रियांचे तर खूपच नखरे चालू होते..ज्या ठिकाणी मेकअप करत होतो तिथेच तरुण पुरुष सुद्धा मस्करी करायला यायचे एकंदरीत त्यांच्यात एकमेकांना आलिंगन देणे हे तसं नॉर्मल च होत..आम्ही आमच काम गपचूप करत होतो पण मध्ये मध्ये त्यांच्या चेष्टा मस्करी मुळे आम्ही देखील विचलित व्हायचो मध्ये मध्ये तर आमची देखील चेष्टा व्हायची..
एक तर म्हणाला काही म्हणा पण आमच्या मित्राने मेकअप करणारी बाकी भारीच आणली आहे एकदम “मॅरेज मटेरियल विथ क्युट फेस”..मला आता लाजाव की रागावायच कळत नव्हतं ..मी मुद्दाम माझं मंगळसूत्र वर काढलं ..तसे ते म्हणाले..,” बघा बघा रे लायसन आहे…उगाच नो एन्ट्री मध्ये घुसू नका..आणि हसायला लागले..तसा एकजण म्हणाला..”अरे पण आम्ही कुठे ट्राफिक चे नियम पाळतो..सिग्नल तोडायचा आणि पावती फाडायची..असून असून किती असणार दंड..? असे म्हटल्यावर सर्वच हसायला लागले त्यात त्या स्त्रिया देखील सामील झाल्या..आम्ही पुरत्या खजील झालो ..मी तर खाली मान घातली ती काढलीच नाही ..तशी एक बाई म्हणाली ..” ए चला आता इथून आमचा मेकअप होउदे आधी , नाहीतर इथेच दुपार व्हायची..आणि काय नाव ग तुझं ..तिने मला विचारलं..मी म्हटलं, ” सुमेधा” ..छान नाव आहे आणि ऐक आमचा मेकअप झाला की याना जरासा फेस पॅक लाव..चला आता..तसे सर्व जेन्ट्स उठले आणि दुसरीकडे गेले..मी म्हटलं, अहो आम्ही गावाकडच्या आहोत आणि आम्हाला पुरुषांचा मेकअप नाही करता येत…तशी ती म्हणाली अग इथे सर्रास सर्व करतात..नुसते फेसपॅक चेच पाचशे टीप देतील ते…मी मनात चरकले..”या लोकांना पैशाची काही किंमतच नाही का..? तशी पैशाची खरी किंमत आमच्याशिवाय यांना काय कळणार म्हणा..” पण पैसा शेवटी गरजेचा तर होताच आणि मी विचार करत होते की आपल्याला थोडीच त्या मुलांशी लगट करायची आहे वरवर मेकअप करून एवढे पैसे मिळत असतील तर तसे वावग काही नाही..” मी म्हटलं ..” अहो आधी तुमच्या लेडीज चे मेकअप तरी होऊदे मग विचार करू..” तशा त्या म्हणाल्या अग बायकांचं मन कधी भरत का..? तू त्यांना सांगायचं झाला मेकअप चला आता उठा..आणि हसायला लागली..तसे बघता बघता आम्ही चौघांनी बऱ्याच जणींचा मेकअप संपवला होता आणि आरशात पाहून त्या खुश देखील होत होत्या..बघता बघता दहा वाजले आणि आम्ही सर्व लेडीज चा मेकअप वेळेत संपवला..आता पूर्ण दिवसभर आम्हाला फक्त प्रत्येकीला टच अप करावं लागणार होतं..एवढ्यात ते तरुण टपकले आणि चला आता आमचा मेकअप अस बोलून खुर्चीवर बसले..
मी तीनही मुलींना एका एकाचा मेकअप करायला सांगितले ..तसा ज्याने आपलं नाव अमित सांगितलं होतं तो म्हणाला..आणि मॅडम तुम्ही नाही करणार..? मी बावरले आणि म्हणाले ..न न म्हणजे या करतील ना..तसा तो म्हणाला मॅडम माझा मेकअप तर तुम्हीच करणार..मी म्हणाले ..” अहो या करतील ना” नाही नाही तुमच्या एवढ्या या तरबेज नाहीत..” अहो मेकअप चांगला झाला तर दोन हजार फक्त टीप..मी काहीही बोलले तरी यांचे उत्तर असणारच होत..मी नाईलाजाने त्याला बसायला सांगितलं आणि मेकअप सुरू केला..गालाला हात लावल्यावरच तो उडाला..” ओहह माय गॉड एवढा मुलायम हात..मॅडम तुम्ही खरच खूप सुंदर आहात..मी म्हणाले प्लिज तुम्ही पर्सनल बोलू नका..मी विवाहित आहे..” अहो त्यात काय मी काय लग्नाची मागणी नाही घालत आहे..बरं बर करा मेकअप..मेकअप करताना त्याची नजर नुसती माझ्यावर होती कधी खाली वाकताना काही दिसेल या उद्देशाने नुसता पाहत होता..मला कसेसेच झाले होते..एकदाचा आम्ही मेकअप संपवला आणि त्यांनी सर्वांना मिळून पाच हजार दिले..मी म्हणाले अहो एवढे पैसे कशासाठी..? तसे ते म्हणाले ” अहो तुमच्या कलेसाठी..आम्ही कलेचे भोक्ते आहोत ..आता दिवसभर पुन्हा आमचं टच अप करायचं ..आणि त्यासाठी नको म्हणू नका…” मी म्हणाले ठीक आहे..आता दिवसभर कुणाचा मेकअप प्रॉब्लेम झाला किंवा उतरला तर आम्हाला सज्ज राहायचं होत..आणि आम्ही सज्ज होतो..
क्रमशः