बराच वेळ एकांतात घालवल्यानंतर मी उठले अन फ्रेश झाले..आज तर घरची जास्तच आठवण येत होती..घरी जायचे वेध लागले होते अन खूपच भावना दाटून येत होत्या..अंकीता ने मला आराम करायला तर सांगितला होता.पण एकटी राहिले की घरची आठवण अन त्या भयानक स्वप्नाची आठवण यायची..त्यापेक्षा मी तयार होऊन खाली जाण्याचा निर्णय घेतला. खाली मोठा कार्यक्रम चालू होता.सर्वांनी आज पारंपरिक पोशाख घातले होते..अन प्रत्येक जण माईक वर आपले अनुभव अन कार्यक्रमाबद्दल सांगत होता..प्रत्येकाने काही न काही सांगायलाच पाहिजे असा दंडक होता..एकंदरीत इतर दिवशीच्या कार्यक्रमापेशा आज सुंदर आणि सोज्वळ कार्यक्रम वाटत होता..अगदी झाडून सर्वच हजर होते..अन मध्ये मध्ये ज्यांनी ज्यांनी संपूर्ण कार्यक्रमात विशेष रंगत आणली अथवा मदत केली त्या सर्वांचे सत्कार पार पडत होते..दुपार पर्यंत हाच कार्यक्रम चालू असणार होता अन दुपारी जेवून मग कार्यक्रमाची सांगता होती..
सर्व पाहुणे मंडळी, मित्रमंडळी भरभरून कार्यक्रमबद्दल बोलत होती.अमित आणि त्याचे मित्र केदार, रोहित, प्रथमेश अन्य सुद्धा उपस्थित होते..एकूणच या कार्यक्रमात एक वेगळीच रंगत पाहायला मिळत होती..हास्य विनोद अन कार्यक्रमात घडलेल्या विनोदी किश्यांनी हशा आणि टाळ्यांचा पाऊस पडत होता..कधी कुणावर फिश पॉंड्स देखील केले जात होते..त्यामुळे थोडी आम्हीदेखील त्या कार्यक्रमाची दुरूनच मजा घेत होतो..अन एवढ्यात अमित बोलायला उठला अन थाटात माईक पकडून बोलू लागला..”गुड आफ्टरनून ऑल फ्रेंड्स, रिलेटिव्हज अँड वेल विशर्स…” मी कान देऊन ऐकू लागले..अमित तसा खूपच हँडसम होता.अन त्याच बोलणं एकदम मधाळ होत..कुणावरही भुरळ पडावं अस व्यक्तिमत्व होत..त्यात मोठा बिजीनेस पर्सन असल्याने क्वचितच कुणी इम्प्रेस झालं नाही तर नवल..
अमित सर्व कार्यक्रमाची खुप तारीफ करत होता.अन आयोजकांचे आभार मानत होता..सांगताना तो म्हणाला,” आज या कार्यक्रमाची सांगता होतेय अन आम्ही इथून खुप काही गोड आठवणी घेऊन जात आहोत..माझ्या सर्व मित्र मंडळींना तर या कार्यक्रमात फारच मजा आली.न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम या ठिकाणी रंगला.” हे ऐकत असताना माझ्या अंगावर शहारे उठत होते..कारण यांच्या मित्रांनी आमचीच तर मजा घेतली होती..मनसोक्त ताव मारला होता..पुढे तो सांगू लागला,” मी आजपर्यंत कित्येक कार्यक्रम अटेंड केले परंतु या कार्यक्रमात आम्हाला जे गवसलं ते कधीच न विसरणार आहे आणि आम्ही विसरू शकत नाही अन विसरणार देखील नाही..
“त्या वाक्यानी माझे रोम रोम पुल्लकित होत होते..पुढे जाऊन अमित म्हणाला,” आज आम्ही आपापल्या घरी निघून जाऊ पण याठिकाणी ओळख झालेल्या सर्वांची मी निश्चित कायमस्वरूपी ओळख ठेवेन अन माझ्यापरीने काही कधीही अडचण असल्यास मी नेहमी तत्पर असेन.” आणि आज या ठिकाणी बहुतेक जणांचे सत्कार पार पडले .ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला हातभार लावला त्या सर्वांचे आभार व्यक्त केले गेले..पण मी आता अशा व्यक्तीचे आभार मानणार आहे आणि एक छोटेखानी सत्कार करायची विनंती करणार आहे त्या म्हणजे गेले तीन दिवस सर्वांचा छान मेकअप करणाऱ्या टीमचे आणि त्यांच्या प्रमुख सौ सुमेधा मॅडम यांचा..अन सर्व माझ्याकडेच पाहू लागले..”
मला तर कसेसेच झाले होते.मी चकित झाले होते ..अंकिता आणि आमच्या मुली मला काँग्रेट्स करत होत्या.मी मनोमन बावरले होते.थोडी खुशी आणि भीती अशा कात्रीत सापडले होते..,अमित पुन्हा पुन्हा मला स्टेजवर बोलवत होता.मी जागीच स्तब्ध झाले होते..अंकिता ने तर मला बळेच उठवले अन स्टेजवर घेऊन आली.. नवरदेवाच्या आणि नवरीच्या आई वडिलांकडून माझा शाल ,श्रीफळ आणि गिफ्ट देऊन सत्कार केला गेला..मी पार भारावून गेले..अन अमित कडे स्मित हास्य करून पाहिलं..एका मोठ्या कार्यक्रमात माझा सन्मान झाला होता आणि यामुळे माझ्या ब्युटी पार्लर व्यवसायाला नक्कीच उभारी मिळणार होती..
मी सन्मान घेऊन पुन्हा जाग्यावर आले.. अन विचार करू लागले, सन्मान तर आपला झाला परंतु त्यासाठी किती त्याग झेलावा लागलाय हा ही विचार डोकावत होता..कदाचित माझी सत्व परीक्षा कुणीतरी घेतली असावी असं वाटून गेलं..मी कित्येक भावनिक गुंत्यात सापडली होती..एक बाजूने मी देखील तर त्यांना सहकार्य केल होत म्हणून तर त्यांची हिम्मत वाढली होती..आणि त्यांनी केलेल्या रोमांसनी मी देखील तर उत्तेजित झालेच होते..माझं नेहमी द्विधा मनस्थितीत अडकणेच चालू होतं..अन केदार फिश पॉंड् वाचायला उठला अन फिश पॉंड् चक्क माझ्यावर होता..” ना आवडे चंदन, ना आवडे केवडा, ना वेड चाफ्याचे..स्पर्श होता पाने मिटती लाजाळूच्या झाडाची..तीच आवड आम्हा मित्रांची..”
मी ऐकून पार लज्जित झाले होते..त्यांनी चक्क दोन वाक्यात मला सर्वांसमोर खुल केलं होतं..सर्वजण टाळ्या वाजवत होते अन फिशपॉंड् गुलाब घेऊन स्वीकारावा लागणार होता..मी तेव्हाही नकार देत होते पण प्रत्यक्ष अमित मला जागेवर न्यायला आला होता अन बॅक ग्राउंड ला ,” ना कजरे की धार..ना मोतींयोंके हार..ना कोई किया सिंगार फिर भी कितनी सुंदर हो..” हे गाणं वाजवल होत..अन मी खाली मान घालून ते गुलाब स्वीकारलं..अन पटकन येऊन पुन्हा जाग्यावर बसली..अशा रीतीने आणखी तासाभरात कार्यक्रम संपला अन आम्ही सर्वजण जेवायला गेलो..प्रत्येक वेळच जेवण अप्रतिम असच होत..आम्ही जेवत असताना अमित आणि त्याचे मित्र आले अन अमित म्हणाला,सुमेधा मॅडम तुम्ही खूप सुंदर आहात खरच..तुमच्या आठवणी आमच्या नेहमी स्मरणात राहतील..आणि प्लिज आपला नंबर द्या ना, म्हणजे तुम्हाला आम्ही आणखी चांगल्या ऑर्डर देऊ शकतो..किंवा आपलं बोलणं कन्टीन्यू राहू शकत..मी म्हटलं, अंकिता चा आहे ना मग बस झालं ना..तसा अमित म्हणाला ,”अहो पण अंकिता सुमेधा नाही ना होऊ शकत..सुमेधा ती सुमेधाच..अन पुन्हा रिक्वेस्ट केली..
मी शेवटी नंबर दिलाच..कारण मी इथे आल्यापासून नकार आणि होकार या द्विधा मनस्थितीत सापडली होतीच आणि अशी सुटका होणार नव्हती..आमचं जेवण संपलं अन आम्ही आमच्या रूम वर जाण्यास निघालो..अमित आणि त्याचे मित्र आम्हाला भरभरून डोळ्यात साठवत होते.जणू काही कुणी जवळचा दूर जातोय असे वागत होते..मी चकित झाले होते की यांना काय किती मुली पडलेल्या असतील पण आमच्यात एवढे काय गुंतल्यासारखं करत आहेत..आम्ही त्यांना बाय बाय केला आणि रूम वर आलो..त्या सर्वांच्या स्वतःच्या गाड्या असल्याने त्यांनी लवकरच निघायचा प्लॅन केला होता..अन मी देखील अंकिता ला म्हटलं .आपणही लवकर निघू म्हणजे थोडी शॉपिंग करता येईल.तशी अंकिता तयार झाली अन आम्ही पटापट पॅकिंग केली अन पुन्हा खाली आलो..हॉटेल च्या बाहेर पडताच गेटवर एक आलिशान गाडी उभी होती अन आम्ही येताच गाडीचा दरवाजा उघडून ड्रायव्हर म्हणाला ,”आईए मॅडम पधारिये” मी चकित झाले..म्हटलं चुकून आपल्याला हा कुणी दुसराच समजत आहे..
आम्ही गाडीत न बसता पुढे जात होतो..तरी ड्रायव्हर मागोमाग आला आणि म्हणाला ,” आप सुमेधा मॅडम हो ना..?”मी म्हटलं हो पण त्याचे काय..? अजी अमित साहब ने बोला हैं की आपको जहाँ जहाँ जाना हैं वहा लेके जावो और बाद मे स्टेशन छोडो..आप प्लिज बैठ जाइये नही तो मेरी खैर नही.. त्याने खूप विनवणी केल्यावर आम्ही गाडीत बसलो..जणू मी एखाद्या कंपनीची मालकीण असावी अशा थाटात सिक्युरिटी नी मला सॅल्युट केलं होतं..सर्व भारी वाटत होतं..
आम्ही पहिल्यांदा मार्केट मध्ये जाऊन खरेदी केली..राधा साठी कपडे, मिस्टरांसाठी कपडे ,घड्याळ अशा वस्तू घेतल्या अन भरपूर मिठाई घेतली..अंकिता ने देखील जोरदार शॉपिंग केली अन अंकिता म्हणाली,” ड्रायव्हर हमे सी लिंक देखना हैं हमे वो रस्ते से ले चलो..”मी म्हणाले कशाला ग उगीच..तशी ती म्हणाली अहो जवळच आहे ना जाऊया त्या मार्गाने..तशी ड्रायव्हर ने गाडी त्या दिशेने वळवलीच अन थोड्याच वेळात मस्त असा सुंदर सी लिंक दृष्टीक्षेपात आला..जसा सी लिंक जवळ येत होता तसं खूप छान दृश्य आमच्या डोळ्यांना सुखावत होत…पूर्ण नजारा आम्ही डोळ्यात साठवला..अशा रीतीने आम्ही दादर स्टेशन आलो अन ड्रायव्हर चे आभार मानले..तसा तो म्हणाला मॅडम शुक्रिया तो अमित साब का किजिये..हम तो क्या नोकर हैं..”
मी हो म्हटलं आणि आम्ही स्टेशन मध्ये आलो..बरोबर अर्ध्यातासाने आमची ट्रेन आली अन आम्ही सामान ठेऊन मस्त पैकी सीटवर आडव्या झालो..मला तर घरी जाणार म्हणून खूप आनंद झाला होता..
क्रमशः