शाळा सुटली पाटी फूटली-( भाग 2)
दप्तर पाठीवर मारून आणि मनाला खंबीर करत मी डोंगरे मॅडमच्या टेबलापाशी पोचलो. वर्गातली सगळी मुलं घरी गेली होती. मॅडम फळा पुसायला लागल्या. बाहेर कल्याणसिंग म्हणजे आमच्या शाळेचा पिऊन व्हरांद्यात उघडणाऱ्या खिडक्या बंद करत माझ्याकडे पाहून हसत होता. मनातल्या मनात त्याला शिव्या देऊन मी पुढे येणाऱ्या वादळाची वाट पाहू लागलो. फळा पुसून झाल्यावर डोंगरे मॅडम आपल्या खुर्चीवर बसताना मला म्हणाल्या, “मग बोल निलेश, असा सुस्त का झोपला होतास, काही प्रोब्लेम आहे का??” मी चाचरतच म्हणालो, “नाही मॅडम, तस काही नाही…”. मी पुढे काही बोलण्याच्या अगोदरच मॅडमनी मला दरडावून विचारले, “तू कुठे दादागिरी वगैरे करतोस का रे???”. मी चमकलोच आणि फक्त डोकं नकारार्थी हलवले. त्यावर आवेशात येऊन त्या म्हणाल्या, “तू शाळेत हत्यारं घेऊन येतोस काय थांब तुझ्या आईबाबांनाच सांगते”. आता मात्र माझी टरकलीच, मी घाबरून म्हणालो, “नाही …