शाळा सुटली पाटी फूटली-( भाग 2)
दप्तर पाठीवर मारून आणि मनाला खंबीर करत मी डोंगरे मॅडमच्या टेबलापाशी पोचलो. वर्गातली सगळी मुलं घरी गेली होती. मॅडम फळा पुसायला लागल्या. बाहेर कल्याणसिंग म्हणजे आमच्या शाळेचा पिऊन व्हरांद्यात उघडणाऱ्या खिडक्या बंद करत माझ्याकडे पाहून हसत होता. मनातल्या मनात त्याला शिव्या देऊन मी पुढे येणाऱ्या वादळाची वाट पाहू लागलो. फळा पुसून झाल्यावर डोंगरे मॅडम आपल्या …